अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचार बंदी असतानाही अकोला शहरात विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसांनी आता सक्तीने कारवाई सुरू केली आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. विशेषतः काही तरूण गाड्या घेवून फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना खाकीचा प्रसाद दिला.
(व्हिडिओ ः अमित गावंडे)