पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी सैनिकी शाळांमधील माजी विद्यार्थ्यांची मदत घेता येणार :
अमळनेर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 21 दिवसांचे लॉक डाऊन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व गृहरक्षक दला वर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. यासाठी त्याना राज्यातील सैनिकी शाळाची मदत घेता येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत देशसेवेची संधी मिळणार असून त्यांनी राष्ट्रहित जोपासण्यासाठी स्वयं प्रेरणेने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन राज्य सैनिकी शाळा असोसिएशन, राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले आहे.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news