#ResultsWithSakal : भाजप महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी घेतले तळ्यातल्या गणपतीचे दर्शन
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी मतमोजणीला जाण्यापूर्वी देवदर्शनावर जोर दिला. सारसबाग येथे त्यांनी आमदार राहूल कुल यांच्या सोबत गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शनिवार पेठेतील दक्षिण मु़खी मारूतीचे दर्शन घेतले.त्यानंतर ओंकारेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेल्या. आम्हाला महायुतीचे नेते, मतदार यांचा आशिर्वाद आहेच, पण आध्यात्मिक आशिर्वादही आवश्यक असल्याने दर्शन घेतले आहे. आमचा विजय निश्चित आहे, अशी भावना कांचन कुल यांनी व्यक्त केली.
#ResultsWithSakal #ElectionResult #Loksabha2019
#Maharashtra #Pune Girish BapatBJP Maharashtra #KanchanKool