स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना महामेट्रोला स्वारगेट चौकामध्ये एक भुयार सापडलेले आहे. भुयाराची लांबी 57 मीटर असून पूर्वीच्या काळी कात्रज तलावातील पाणी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठीची ही व्यवस्था म्हणजे हे सापडलेले भुयार आहे असे, महामेट्रोचे म्हणणे आहे.