'तिनं आधी स्वतःच्या कपड्यांकडे बघितलं. नेहमीचीच साडी-ब्लाऊज. खाकी कपडे नव्हतेच अंगावर! नंतर तिला जाणवलं की, आपल्या आसपास कागदच कागद पसरलेत... म्हणजे आपण चक्क काहीतरी लिहिलंय... पेनचं टोपणही आपण अजून लावलेलं नाही...' शुभदा साने यांची 'दिवस असा एखादा' ही कथा सकाळच्या 'शब्ददीप' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः गौरव दिवेकर)