पुणे: प्रभाग क्रमांक 12 मयूर काॅलनी, डहाणूकर काॅलनी येथून पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी खुल्या गटातून आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली होती. उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नांवही होते. मात्र, आज अगदी आयत्यावेळी कोथरुडचे शिवसेना विभाग प्रमुख नवनाथ जाधव यांचा पक्षप्रवेश करवून घेऊन भाजप नेत्यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. नाराज झालेल्या जगन्नाथ कुलकर्णी यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पक्षाच्या निवडणूक कार्यालयासमोर आपली पत्नी, मुलगी व आईसह उपोषण सुरु केले आहे.