सचिन तेंडुलकरचे असंख्य फॅन्स आहेत. प्रत्येक फॅन सचिनला क्रिकेटचा देव म्हणतो. मात्र मुंबईत राहणाऱ्या अभिषेक सामने सचिनचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याने चार बाय आठ आकाराचं सचिनचं एक आगळं वेगळं पोट्रेट साकारलं आहे. या पोट्रेटमध्ये त्याने सहा रंगछटांच्या तब्बल तीस हजार बारा कागदी टिकल्यांचा वापर केला आहे!
#HappyBirthday #SachinTendulkar #Cricket #SachinFan