लॉकडाऊनमध्ये शाळांची दारे बंद होऊन मोबाईलच्या स्क्रीनवर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मुलं घरात बंदिस्त झाली. नियमाच्या चौकटीत मुलं कंटाळली, हिरमुसली. रागावली, तर कोणी आजारी पडले. परिणामी, कोरोनाकाळात स्क्रीनच्या दुनियेत ही मुले अडकली. नाराज झाली. अशा वेळी मुलांचे शिक्षण प्रसन्नतेने व तितकेच परिणामकारक करण्यात सृजन आनंद विद्यालयाने विविध प्रायोगिक प्रयत्न केले. मुलांच्या सृजनशिलतेसोबत त्यांच्यातील आनंद टिकून राहावा यासाठी पालकांच्या मदतीने मुलांच्या आनंदी शिक्षणाकडे पुढचे पाऊल टाकले.
बातमीदार : संभाजी गंडमाळे
िव्डीओ- बी.डी.चेचर