मद्यपान करून गाडी चालवणं हा गुन्हा आहे. त्यामुळे अनेक देशात ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात पकडले गेल्यास दंड आणि तुरूंगवासही होऊ शकतो. या प्रकरणात अनेकदा काही जण पकडले जाऊ या भीतीनं पोलिसांपासून पळ काढतात पण तुम्हाला माहितीये फ्लोरिडामधल्या एका इसमानं पळून न जात आपण मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती फोन करून पोलिसांना दिली, तेव्हा स्वत:चा गुन्हा कबुल करणाऱ्या या चालकाचा प्रमाणिकपणा पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. मायकल लेस्टर असं या इसमाचं नाव असून ३१ डिसेंबरच्या रात्री त्यानं मद्यपान केलं. अतिमद्यपानामुळे त्याला स्वत:वर ताबा मिळवणं अवघड जात होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews