पुण्यातील रुपाली जाधव या उच्चशिक्षित तरुणीने मोठ्या पगाराची नोकरी नाकारून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे. रुपाली ही अंडा भुर्जीची गाडी चालवत असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद तिला मिळत आहे.
आठवीमध्ये असल्यापासून मी मामाच्या अंडा भुर्जीच्या व्यवसायामध्ये ती मदत करत होते. मामाकडूनच हा व्यवसाय कसा चालवायचा ती शिकली. 2013 साली मामाच्या निधनानंतर सर्व जबाबदारी रुपालीच्या खांद्यावर पडली. शिक्षण घेत तिने अंडा भुर्जीचा व्यवसाय सुरु ठेवायचा निर्णय घेतला. नोकरीपेक्षा जास्त नफा व्यवसायामध्ये आहे हे रुपालीला समजले होते. त्यामुळे एबीएचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीपेक्षा व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी तिने प्रयत्न केले. घरच्यांनीही तिच्या या निर्णयाला साथ दिली. तिच्या प्रयत्नांना हळू हळू यश प्राप्त झाले. आज पुण्यात तिने अंडा भुर्जीचे 3 आऊटलेट सुरु केले आहेत.
#sakal #pune #successstory