बेळगाव : बेळगाव महापालिकेवर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजा विरोधात हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले असून महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार समिती कार्यकर्तामधून व्यक्त होत आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी भाषिकांनी विराट मोर्चात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांना कर्नाटकात घातलेली बंदी निंदनीय आहे. त्यामुळे शिवसैनिक कर्नाटकात प्रवेश करणारच, या उद्देशाने महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी दुधगंगा नदीजवळ असणाऱ्या कर्नाटक हद्दीत जाण्याचा जोरदार प्रयत्न केला.