राज ठाकरे विनामास्कचं नाशिकमध्ये दाखल!
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता.५) तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आगमन झाले आहे. यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी "मास्क काढ" असा इशारा यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना यावेळी केला. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावला नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,' असं ते म्हणाले होते. राज यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा रंगली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये येत असल्याने मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (व्हिडिओ - केशव मते)