'मेनस्ट्रुअल कप' वापरा अन् सुरक्षित मासिक पाळीचा अनुभव घ्या
नागपूर : सुरुवातीच्या काळात मासिक पाळी आल्यानंतर आपण कापडाची घडी वापरत होतो. मात्र, त्यामुळे डाग लागण्याची भीती होती. तसेच त्या कापडामुळे आपली मासिक पाळी किती स्वच्छ असेल? हा देखील एक मोठा प्रश्न होता. त्यानंतर हळूहळू सॅनिटरी नॅपकिन्स (पॅड)बद्दल जनजागृती झाली. दुर्गम भागात पॅड्सबाबत जनजागृती झालेली नसली, तरी शहरी भागात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. मात्र, आपल्या देशात या पॅड्सची विल्हेवाट लावणं कठीण होऊन बसलंय. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे. मग आपल्या मासिक पाळीसोबतच पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर त्याला पर्याय म्हणजे 'मेनस्ट्रुअल कप'...पण, या कपच्या वापराविषयी तुमच्या मनात भीती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच.