देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली आहे. यामध्ये त्यात ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. मात्र हे लसीकरण कसं होणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे यासंदर्भातील प्रश्न अनेकांना आहेत. पाहुयात कसे असणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण.
#india #COVID19 #CoronaVaccine #Loksatta #latestvideo