मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. गरज पडली, तर पुन्हा लॉकडाउन करु असा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दर दिवशी तीन हजारपेक्षा जास्त नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापेक्षा दुसऱ्या आठवडयात १४ टक्के जास्त रुग्णवाढ दिसून आली आहे. जाणून घेऊयात राज्यात सध्या नेमकी काय स्थिती आहे.
#Coronavirus #Maharashtra #Covid19 #Lockdown #CoronaCasesSpike #India