राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित बसून चर्चा केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मांडली.