जामखेडमध्ये कोरोनाचा विस्फोट;एकाच दिवसात वाढली उच्चांकी रूग्ण संख्या

Jamkhed Times 2020-08-11

Views 16

जामखेडमध्ये कोरोनाचा विस्फोट

मंगळवारी कोरोनाने दिला जबरदस्त तडाखा

एकाच दिवशी तब्बल 22 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे

आजवरचा एकाच दिवसातला सर्वोच्च आकडा पार

जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वेगाने सुरू आहे. जामखेड शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. शहराला हाॅटस्पाॅट घोषित करण्याची वेळ कधी येणार हा सवाल जनतेच्या मनात आहे. जामखेडमध्ये कोरोनाने विक्राळरूप दाखवत मंगळवारी जबरदस्त तडाखा दिला. एकाच दिवशी तब्बल 22 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने तालुका हादरून गेलाय. आजवरची एकाच दिवसातली सर्वोच्च रूग्णसंख्या मंगळवारी नोंदवली गेली आहे.

मंगळवारी आरोग्य विभागाने 120 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यात केल्या यात तब्बल 22 जण पाॅझिटिव्ह तर 98 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.मंगळवारी पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जामखेड शहरातील कोर्ट रोड 02, पोकळेवस्ती 06, म्हेत्रेवस्ती 01,राळेभात गल्ली 01, तपनेश्वर गल्ली 01, पंचायत समिती 01, खाडे नगर 01, मोहा 01, पाडळी 02, पिंपळगाव आळवा 06 असे 22 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ युवराज खराडे यांनी दिली. जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता उद्रेक आता चिंताजनक बनत चालला आहे.जामखेड शहरात कोरोनाचा मोठा विस्फोट झाल्याने शहर आता कोरोनाकेंद्र बनले आहे.

ब्युरो रिपोर्ट - जामखेड टाईम्स

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS