सर्वाैच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील प्रदुषण कमी करण्याकरता बीएस फोर या वाहनांची नोंदणी 31 मार्च 2020 पर्यंतच वाहनधारकांना करणे बंधनकारक असुन नोंदणी न केल्यास ती गाडी अपात्र असेल अशी माहिती पुणे आरटीओ चे परिवहन अधिकारी अजिंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वायु प्रदुषण कमी करण्याकरता 31 मार्च नतंर बीएस सिक्स ही वाहने नव्याने येणार असुन याकरता बीएस फोर ची नोंदणी आवश्यक असुन ती नोंद न केल्यास वाहनधारकांची गाडी जप्त केली जाईल. त्यामुळे जे वाहन धारक सध्या नव्याने गाडी घेत असतील तर त्यांनी त्याची पुर्ण शहानिशा करुनच गाडी खरेदी करण्याचे आवाहन शिंदे यांनी केलय . दरम्यान गाडी नोंदणी करण्याकरता 31 मार्च पर्यत जादा अधिकारी ,कर्मचारी यांनी उपलब्ध करुन दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले .