छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्गावर पोहोचले शुक्रवार , २६मार्च १६६७ रोजी

BeingOmkar Films 2020-02-11

Views 1

शुक्रवार , २६मार्च १६६७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्गावर पोहोचले . सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली . ते म्हणाले , “ महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते . आमची एक इच्छा आहे . तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत . " छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले . महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले . दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले . महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला . तर दुस - या तबकात आपला उजवा हात . स्वत : राजांनी . . दुस - या कुणीही नव्हे , चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे ! हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला . त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता . तुतारी निनादली . तोफांचे बार उडाले . पुन्हा चौघडा वाजू लागला .

My Youtube channel link
Please like comments subscribe and press bell icon
https://youtu.be/VSemlKzl5RQ

BeingOmkar films whatsapp group
https://chat.whatsapp.com/J4K4AgSOWAn8Jo7QjWTChg

BeingOmkar films
Telegram whatsapp group
https://t.me/joinchat/AAAAAEj5DxKt-sqziUO8JQ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS