सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये एलपीजी सिलेंडर घेऊन जात असलेला मिनी ट्रकची गुरुवारी सकाळी साडे 6 वाजता त्याच्यापुढे असलेल्या ट्रकसोबत धडक झाली यानंतर मिनी ट्रकमध्ये आग लागली आणि एक एक करून अनेक सिलेंडर ब्लास्ट झाले घटना ओलपाड रोडवर घडली यादरम्यान डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूने जात असलेली स्कूल बस, ऑटो यांसह तीन वाहने या स्फोटाची शिकार झाले बसमध्ये 26 मुले होती, ज्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही