औरंगाबाद - औरंगाबाद पूर्व मतदार संघातून भाजपचे अतुल सावे यांनी पुन्हा एकदाविजय मिळवला आहे त्यांनी एमआयएमचे गफार कादरी यांचा पराभव केला या विजयानंतर अतुल सावे यांनी माध्यमांशी संवाद साधला 2014 मध्ये येथील जनतेने मला कौल दिला होता मागील पाच वर्षांत जनतेच्या समस्यांचे निराकरणकेल्यामुळे त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली असून पुढील एका वर्षात शहराचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचा विश्वास अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केला