जालना- भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे यात 'मी असेपर्यंतगायी कापणे बंद होणार नाही', असेत ते म्हणत आहेत दानवेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे आपला मुलगा संतोष दानवे यांच्या प्रचारासाठी 19 ऑक्टोबरला रावसाहेबांनी भोकरदन येथील कठोरा बाजारात मुस्लिम नागरिकांसमोर बोलत असताना हे वक्तव्य केलं