होशंगाबाद - मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथे सोमवारी सकाळी एक रस्ते अपघातात चार राष्ट्रीय स्तरावरली हॉकी खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत हे सर्व होशंगाबाद येथे आयोजित एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते दरम्यान त्यांची कार इटारसी आणि होशंगाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 69 वर एक झाडावर आदळली सकाळी 6:45 वाजता हा अपघात घडला