नाशिक - सरकारने लागू केलेल्या निर्यात बंदीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत कांदा निर्यात बंदीविरुद्ध उमराणे, सटाणा, चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली तसेच ठिक-ठिकाणी रस्ते अडवून सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या नाशिक घाउक लिलाव सुद्धा सोमवारी बंद ठेवण्यात आला देशभर कांदा महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय घेतला यामुळे, देशात कांद्याच्या किमती कमी होतील असा हेतू आहे परंतु, सरकारचा हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे