बीड - शहर व जिल्ह्यात साेमवारी रात्री दमदार पाऊस झाला बीड शहरात रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले हाेते शिवाजीनगर पाेलिस ठाण्यातही पाणी शिरल्याने परिसरातील वाहने, कार्यालयातील फर्निचर पाण्याखाली गेले शहरातील लेंडी रोडवरसुद्धा पाणीच पाणी होते या पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पुलावरून पाणी वाहत हाेते रात्री उशिरापर्यंत हा पावसाचा जाेर सुरूच हाेता