रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे.
या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.
अपूर्वानं नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट्स करत आहेत.
अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे.तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.