उद्धव ठाकरे यांच्याकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काहीच राहिले नाही- राधाकृष्ण विखे पाटील

ETVBHARAT 2025-10-13

Views 1

अहिल्यानगर- उद्धव ठाकरे यांच्याकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काहीच राहिले नाही. सरकारने ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले आहे. सरकारने पाऊल उचललेले आहे. सरकार संवेदनशील आहे आणि आणखी मदत करणार आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे काही जण हंबरडे फोडत आहेत. याच्या पलीकडे यांना कोणी घास घालणार नाही. त्यांनी आता ओरडणं बंद केलं पाहिजे असून, सरकारला त्यांचे काम करू द्यावे, असे आवाहन अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लक्ष्‍मण हाके यांना उत्तर देण्‍याची आवश्‍यकता मला वाटत नाही. काय टीका करायची ते करू द्या, असं वक्‍तव्‍य करणारे नेतृत्‍व आपल्‍याला पाहिजे का? याचा समाज बांधवांनी विचार केला पाहिजे. तुम्‍ही व्‍यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही, अशा शब्‍दात मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी त्‍लक्ष्‍मण हाके यांचे नाव न घेता त्‍यांचा समाचार घेतला.
 

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS