भर पावसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तीत पथसंचलन, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं अवलोकन, पाहा व्हिडिओ

ETVBHARAT 2025-09-28

Views 7

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ साली म्हणजेच आजच्या दिवशी बरोबर १०० वर्षांपूर्वी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळं विजयादशमी उत्सवाचे आयोजन भव्यदिव्य तर होणार आहे. तत्पूर्वी आज तिथीप्रमाणे संघाचा स्थापना दिन असल्यानेच संघाच्या स्वयंसेवकांचे ऐतिहासिक पथसंचलन झाले आहे. नागपूर शहरातील तीन वेगवेगळ्या भागातून हजारो स्वयंसेवकांचे तीन गट नागपूर शहर केंद्रबिंदू असलेल्या व्हेरायटी चौकात एकाचवेळी दाखल झाले. त्या ठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतसह महानगर प्रमुख राजेश लोहिया आणि इतर ही पदाधिकारी उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी तीनही पथसंचलनाचे निरीक्षण केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील उपस्थित होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS