रायगडच्या मंत्र्यांची एकाच व्यासपीठावर हजेरी, अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी साधला संवाद

ETVBHARAT 2025-09-08

Views 9

रायगड - जिल्ह्यातील दोन मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे एकाच व्यासपीठावर दिसले. अलिबागमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात दोघांची उपस्थिती राहिली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांशी संवादही साधला. अलिबाग येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या शासकीय कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या दोन मंत्र्यांची विशेष उपस्थिती राहिली. राजकीय स्तरावर वेगवेगळ्या भूमिका असणारे हे दोन्ही मंत्री एकाच व्यासपीठावर आल्याने उपस्थितांत उत्सुकता निर्माण झाली होती. कार्यक्रमादरम्यान त्यांनी एकमेकांशी संवाद साधत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमात पंचायत राज प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रायगडमध्ये दोन्ही मंत्र्यांची एकत्र उपस्थिती आणि संवाद हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS