पुण्यातील 'या' मंडळानं सोलरवर तयार केली वीज; गणेशोत्सवानंतर दुर्गम भागातील शाळेला देणार सोलर

ETVBHARAT 2025-09-05

Views 17

पुणे : पुणे शहराचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध विषयांवर देखावे करण्यात आले असून हे देखावे पाहण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहे.अशातच पुण्यातील भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट असा पहिला मंडळ आहे ज्यानं यंदाच्या गणेशोत्सवात सोलार पॅनल तयार करत संपूर्ण मंडळ दिव्यांनी उजाळल आहे.  मंडळाकडून खडकवासला धरणातील कॅनलचा देखावा तयार केलाय. त्यावर सोलार लावले आहेत. पुणे शहरात सार्वजनिक गणेश मंडळांच्याकडून यंदाच्या वर्षी सामाजिक तसंच देशभरातील विविध मंदिरांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टकडून सोलार पॅनल तयार करून ४०० व्हॉट वीज तयार केली आहे. विशेष म्हणजे मंडळात जी लाईट लावली आहे. त्या याच सोलार पॅनलवर चालत आहेत. गणेश विसर्जनानंतर या मंडळाकडून हा सोलार भोर वेल्हा इथल्या दुर्गम भागातील शाळेला देण्यात येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS