बीएमसीतील मराठा कर्मचारी धावले मदतीला; जेवण, नाष्टा, पाण्याची केली सोय

ETVBHARAT 2025-08-31

Views 4

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था महानगरपालिकेत नोकरी करणाऱ्या मराठा समाजाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यांनी मराठा बांधवांसाठी चहा, बिस्कीट, जेवण, पाण्याची सोय केली आहे. त्याबद्दल मराठा बांधव कृतज्ञता करताना दिसत आहेत. "आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही" अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली होती. पाण्याच्या टँकरची व्यवस्था होताच सर्व आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. रविवार असल्याने  एक दिवस समाजासाठी अशी भावना मनात ठेवून मुंबईमधील मराठा बांधव देखील आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तिसऱ्या दिवशीदेखील आंदोलकांमधील उत्साह जराही कमी झालेला नसून 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी मुंबई हादरून गेली आहे.  

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS