पुरात अडकलेल्या माकडांसाठी एनडीआरएफ टीमचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन, पाहा व्हिडीओ

ETVBHARAT 2025-08-20

Views 55

सातारा - कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीकाठी पूरस्थिती निर्माण झालीय. त्याचा फटका प्राण्यांनाही बसलाय. पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का येथे पुरात अडकलेल्या 11 माकडांना कराडमधील एनडीआरएफ टीमने अथक प्रयत्नांनी रेस्क्यू केलंय. दुपारपासून चाललेलं थरारक रेस्क्यू ऑपरेशन रात्री उशिरा संपलंय. विशेष म्हणजे पश्चिम घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे 11 फुटांनी उघडण्यात आले होते. धरणातील पाणीसाठा 100 टीएमसी झाल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून प्रति सेकंद 85,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. गुहागर-विजापूर महामार्गावर हेळवाक (ता. पाटण) येथे पुराचं पाणी आल्यानं कुंभार्ली घाटातील वाहतूक बंद झाली होती. सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणांमधून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीवरील मूळगाव, नेरळे पूल आणि सातारा तालुक्यातील वेण्णा नदीवरील किडगाव, म्हसवे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्याचा पशु-पक्ष्यांनाही फटका बसला आहे. 

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS