80 हजार रुपये खर्च करुन केलेल्या टोमॅटोच्या बागेचा नुसता 'लाल चिखल'; शेतकरी हवालदिल

ETVBHARAT 2025-06-03

Views 0

बीड : आष्टी शहरातील राम शेळके यांनी 80 हजार रुपये खर्च करुन टोमॅटो लागवड केली. राम शेळके हे बांधकाम कामगार आहेत. काबाडकष्ट करून पैसे गोळा करत त्यांनी ही बाग फुलवली होती. सव्वा एक्करमध्ये सात हजार टोमॅटोच्या झाडांची लागड केली होती. मात्र, टोमॅटो तोडणीला आलेले असताना मुसळधार पावसामुळे बागेचं मोठं नुकसान झालं आहे  बीडमध्ये मान्सूनच्या पावसानं नुकसान झालं. शेतात पाणी साचल्यानं टोमॅटोची बाग जळून गेली. टोमॅटोमधून जवळपास सात लाख रुपये उत्पन्न राम शेळके यांना मिळू शकले असते. पण, त्यांना एकही रुपया त्यांना मिळू शकणार नाही. उलट, ही बाग उपटून टाकण्यासाठी मजुरांचे देण्यासाठी पैसे नाहीत. "उद्या, ही शेती कशी उभा करायची? निर्सगानं आमची साथ सोडली. मायबाप सरकारनं मदत दयावी," अशी मागणी राम शेळके यांनी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS