जळगाव : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम ये" /> जळगाव : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम ये"/>

अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; गिरीश महाजन म्हणाले,"काही आवश्यकता नाही, असं पत्र लिहिण्याची..."

ETVBHARAT 2025-05-19

Views 1

जळगाव : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर "ऑपरेशन सिंदूर" राबवत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यामुळं ऑपरेशन सिंदूर देशभरातच नव्हे तर जगभरातही चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जवानांच्या सन्मानासाठी भाजपाकडून राज्यात विविध ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. यावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "काही आवश्यकता नाही असं पत्र लिहिण्याची" असं म्हणत त्यांनी मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackerays) यांच्या पत्रावरून त्यांना टोला लगावला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS