मध्य रेल्वेवर एसी लोकलमध्ये रेल्वे कर्मचारी विनातिकीट प्रवास करत होता. लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. त्यांनी इतर प्रवाशांचं तिकीट तपासलं पण रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगणाऱ्याला तिकीट विचारलं गेलं नाही. तो प्रवासी खिशामध्ये NRMUC चं कार्ड घेऊन प्रवास करत होता. या प्रवाशांचे तिकीट किंवा पास का तपासले नाही? असं एका प्रवाशाने विचारलं असता टीसीच उलट उत्तर देऊ लागला.
#LokmatMumbai #CentralRailway #WithoutTicket #NRMUC