सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देवडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला अश्पाक मुलानी या तरूणाने युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील गंभीर गुन्हे तपास कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून या अश्पाकची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ १३ जागांसाठी ही भरती झाली होती. यासाठी आलेल्या देशभरातली उमेदवारामधून सातव्या क्रमांकावर अश्पाक यांची निवड झाली.