कोल्हापुरात विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी मोहीम हाती घेतली आहे. याकरिता रविवारी विशाळगडावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी संभाजीराजे यांना प्रशासकीय बैठकीस येण्याची विनंती केली आहे.