राज्यात सध्या मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचे सर्वेक्षण सुरु आहे. काही दिवसापुर्वी अभिनेता पुष्कर जोगच्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी गेले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या काही जातीवरील प्रश्नावरून अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला होता. मध्यंतरी त्याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल अपमानजनक भाषेचा देखील वापर केला होता, जाणून घ्या अधिक माहिती