अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या कारसेवेत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील राम भक्तांनी आपली सेवा बजावली होती. यावेळी ढासाळलेल्या ढाच्यातील विटा कार सेवकांनी आपल्या सोबत आणल्या. एकीकडे अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत असताना या कार सेवकांच्या 31 वर्षांपूर्वीच्या आठवणींना यानिमित्ताने पुन्हा उजाळा मिळालाय.