संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्येच्या राम मंदिरात 22 जानेवारी 2024 ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशातील विविध भागात कार्यक्रमाचं, उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील अनेक नामांकीत आणि राजकीय लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं.