गोष्ट मुंबईची : भाग १३७ | मेट्रो रेल्वेचे एक पार्किंग आहे मिठी नदीच्या खाली!
नव्या वर्षात मुंबईकरांना भेट मिळणार आहे ती भुमिगत मेट्रो मार्ग ३ ची. सिप्झ ते कफ परेड जाणाऱ्या या मार्गातील सिप्झ ते बीकेसी, वांद्रे हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. बीकेसी हे जंक्शनप्रमाणे काम करणार आहे. जिथे मार्ग बदलण्याची आणि गाड्या कारशेडप्रमाणे पार्क करण्याची सोयही असणार आहे. त्यामुळे हे स्टेशन तब्बल अर्धा किलोमीटर लांबीचे आहे आणि त्यामुळेच ते जगातील मोजक्या सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक ठरले आहे! 'मेट्रो मार्ग ३' च्या या अनोख्या स्टेशनचे वैशिष्ट्य समजून घेऊया.
#गोष्टमुंबईची #goshtmumbaichi #mumbai #knowyourcity #kycmumbai #metro #metro3 #mumbaimetro