'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या बाराव्या भागात आपण भेटणार आहोत 'Housequeen' या चॅनेलच्या धनश्री पवार हिला. कोल्हापूर मधून लग्न करून मुंबईत आलेली धनश्री पवार आता गृहिणींच्या गळ्यातील ताईत झाली आहे. मेकअप आणि ब्युटी टिप्स तसेच रेसिपीची व्हिडीओ टाकताना धनश्रीने २ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स कसे कमावले आणि आणि २०२३ मध्ये पुन्हा शून्य सबस्क्राइबर्स पासून सुरुवात करून ती पुन्हा चॅनेल कसे ग्रो करू शकते याविषयी टिप्स तिने शेअर केल्या आहेत. Housequeen च्या सासरच्या मंडळींची तिच्या प्रगतीविषयीची मतं आज या व्हिडीओमध्ये पाहूया..