काही महिन्यांपूर्वीच केदार शिंदे यांनी त्यांच्या या आगामी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या हटके नावामुळे या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबरोबरच केदार शिंदे यांनी या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तो टीझर प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे