लेणी अभ्यासक व सम्यक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष सूरज जगताप यांनी लेणी संरक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ते गेली दहा वर्ष आपलं योगदान देत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक लेणींचा त्यांनी अभ्यास केला आहे. सूरज जगताप हे व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहेत. लेणींसंदर्भात अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ते निःशुल्क अभ्यास दौऱ्याचं आयोजन करतात. सूरज जगताप यांच्या या कामगिरीसाठी नुकतंच त्यांना स्मार्ट इंडिया इन्स्टिटय़ूट व सम्राट फाऊंडेशन ( येवले नाशिक ) यांच्या तर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ देऊन सन्मानितही करण्यात आलं आहे.