विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार असून त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र आहे, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस राबवलं जातंय का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.