अपघातातील 'त्या' १३ जणांच्या शेवटच्या ढोल ताशा वादनाचा व्हिडीओ समोर; आयोजकांनीही व्यक्त केली हळहळ

Lok Satta 2023-04-15

Views 10

अपघातातील 'त्या' १३ जणांच्या शेवटच्या ढोल ताशा वादनाचा व्हिडीओ समोर; आयोजकांनीही व्यक्त केली हळहळ

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसमधील १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हे सर्व जण बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे सदस्य आहेत ही माहिती समोर आली आहे. संबंधित पथक हे मुंबईहून पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव, सुदर्शन नगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून रात्री उशिरा हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं होतं. परंतु, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर तीव्र उतार असलेल्या ठिकाणी बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेवर सुदर्शन नगर भीम जयंती मंडळाचे सदस्य अरविंद कसबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.#pune #busaccidents #mumbaipunehighway #khopoli #mumbai #accidentnews #drbabasahebambedkar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS