Rahul Gandhi on BJP: "गांधी कोणाचीही माफी मागत नाही"; राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर
माझं नाव सावरकर नाही तर गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाही, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. लंडनमध्ये केलेलं वक्तव्य व मानहानी प्रकरणात राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. यावर उत्तर देताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकरांचा उल्लेख करत आपण माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं