मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण या वादावर आपलं स्पष्टीकरण दिलं. 'गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं की तुझं की माझं तेव्हा वेदना होत होत्या' अशा भावना व्यक्त केल्या.