Sanjay Raut: 'सेनेच्या गुढीवर केंद्र सरकारचे आक्रमण'; गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना राऊतांची टीका
'महाराष्ट्रातील घराघरावर पुन्हा शिवसेनेची गुढी फडकवणार' असा निर्धार गुढीपाडव्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, 'गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यात सर्वत्र आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता दु:खी आहे. शेतकरी दु:खी आहे. नवीन वर्ष येऊनही त्यांच्या जीवनात आनंद दिसत नाही. महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. गुढीवर केंद्र सरकारने आक्रमण केले. मोगलाई पद्धतीने त्यामुळे जनता दुःखी आहे पण जनतेचा संकल्प आहे. नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही'