अमोल रामदास भाजीपाले हे अमरावतीतील चांदुर बाजार तालुक्यातील खरवाडी या गावचे शेतकरी आहेत. त्यांना एक हात नाही तरीसुध्दा त्यांनी मोठ्या जिद्दीने स्वत: शेती करून फक्त ७० दिवसांमध्ये अडीच लाखांच उत्पन्न कमावलं आहे. अमोल यांनी त्यांच्या एक एकर शेतामध्ये तब्बल ३५ क्विंटल टरबुजाचं विक्रमी उत्पादन केलं. यामधून त्यांना तब्बल २,७५,००० चं उत्पन्न झालं असून लागवडीकरीता ९५००० खर्च लागला होता. त्यांच्या या कामगिरीचं आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.